बीड मतदार संघातील ३ पैकी २ ग्रामपंचायत माजी मंत्री क्षीरसागर यांच्या ताब्यात
बीड :- जिल्ह्यातील तीन तालुक्यात १३ ग्रामपंचायतीसाठी गुरुवारी मतदान घेण्यात आले. त्यापैकी बीड मतदार संघातील गवळवाडी, अंथरवन पिंप्री-गणपुर आणि अंथरवण पिंप्री तांडा या तीन ग्रामपंचायतीसाठी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी या तीनही ग्रामपंचायत चा निकाल जाहीर झाला आहे. यापैकी अंथरवणपिंप्री- गणपुर व अंथरवन पिंप्री तांडा या दोन ग्रामपंचायतीवर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत.
या निवडणुकापूर्वीच मतदार संघातील झालेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत जवळपास ९० टक्के सोसायट्यावर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. ग्रामपंचायत आणि सेवा सोसायटीच्या निवडणुकीत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी वर्चस्व निर्माण केले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. विद्यमान आमदार यांना अनेक ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागत आहे.
अशोक शिंदे यांच्या नेतृत्त्वात अंथरवन पिंप्री ग्रामपंचायत निवडणुकीत अशोक शिंदे, कांताबाई भगवान पुरभे, गोवर्धन वाघमारे, शिवगंगा भाऊराव प्रभाळे, पुष्पाबाई जालिंदर शिंदे, विद्या संतोष शिंदे आणि अपक्ष अशोक शिंदे हे उमेदवार निवडून आले आहेत तर दिनेश पवार यांच्या नेतृत्त्वाखाली अंथरवन पिंपरी तांडा येथील ७ पैकी ७ उमेदवार निवडून आले असून यात पवार दिनेश, विमल रामभाऊ पवार, पांडुरंग पवार, कमलबाई बाबू पवार, रमाबाई मोहन राठोड, अनिता दिनेश पवार, प्रेमदास राठोड हे उमेदवार निवडून आले आहेत.