*टाकळी भिमा येथील सुनिल वडघुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार*

आकाश भोरडे

तळेगाव ढमढेरे, प्रतिनिधी:

टाकळी भीमा(ता.शिरूर) येथील सुनिलतात्या महिपती वडघुले यांना नुकतेच आदर्श समाजसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार (दि.२५) रोजी निफाड येथील नक्षत्र हॉटेल येथे महाराष्ट्र सातबारा न्यूज चॅनेलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुनिल वडघुले यांनी गेली पंचवीस-तीस वर्षांपासून शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा गावची निस्वार्थी वृत्तीने सेवा करत नागरिकांच्या अडचणी जाणून त्या दुर केल्या. शिरूर पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम करत असताना आजूबाजूच्या पंचक्रोशीतील जनतेला मदत केली तसेच संत योगीराज बाबा महाराज पालखी सोहळ्याचा माध्यमातून पंचक्रोशीतील भाविकांना परमार्थाची ओढ निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या वतीने प्रसिद्ध हवामान तज्ञ अभ्यासक पंजाबराव डख यांच्या हस्ते आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख, महाराष्ट्र सातबारा न्युज चॅनेलचे संपादक दिगंबर वडघुले, उपसंपादक सागर निकाळे, टाकळी भीमा गावचे मा. उपसरपंच पांडुरंग ढोरे, मोहन वडघुले आदि मान्यवर उपस्थित होते.