शिक्रापूर ता. शिरुर येथील पाटवस्ती येथे एका रिक्षा चालकाला पिकअप चालकाने शिवीगाळ केली, दरम्यान रिक्षा चालकाने शिवीगाळ करण्याबाबत जाब विचारल्याने सात जणांनी रिक्षा चालकाला मारहाण केल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे, ईश्वर नरके, ऋषिकेश ( पूर्ण नाव माहित नाही ) यांसह तीन अनोळखी इसमांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
L शिक्रापूर ता. शिरुर येथील रिक्षा चालक अकबर बागवान हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ आर पी १०४२ हि रिक्षा घेऊन जातेगाव खुर्द येथे जात असताना पाट वस्ती येथे ऋषिकेश याने त्याला शिवीगाळ केली, काही वेळाने अकबर जातेगाव येथून आला त्यावेळी त्याने ऋषिकेश तला शिवीगाळ करण्याबाबतचा जाब विचारला त्याचवेळी ऋषिकेश सह काही युवकांनी त्याला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरवात केली यावेळी अकबर याने आरडाओरडा केल्याने त्याची पत्नी भांडणे सोडवण्यास आली असता मारहाण करणाऱ्या युवकांनी अकबरच्या पत्नीला देखील मारहाण केली, याबाबत अकबर उस्मान बागवान वय ४२ रा. बांदल कॉम्प्लेक्स पाटवस्ती शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी केदार खंडेराव शितोळे, केतन खंडेराव शितोळे, ईश्वर नरके, ऋषिकेश ( पूर्ण नाव माहित नाही ) यांसह तीन अनोळखी इसम सर्व रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.