औरंगाबाद :- (दीपक परेराव) न्यू हनुमान नगर चौक कमानी जवळ मुख्य रस्त्यावर मातीच्या ढिगारा मुळे नागरिकांना वाहन चालवणे अत्यंत कठीण झाले असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.कमानी जवळ असलेल्या पाण्याच्या टाकीचा व्हॉल असल्याने मनपा पाणी पुरवठा विभाग नेहमी काहीना कामा निमित्त खड्डा खोदुंन काम करीत असते गेल्या महिन्या भरापासून त्या ठिकाणी काम करुन रस्त्यावर मातीचा ढिगार तासच सोडून रस्त्यावर टेकडी निर्माण झाली आहे.हा रस्ता न्यू हनुमान नगर मध्ये कमानीतून कॉलनी मध्ये प्रवेश करताना असल्याने अनेक वाहनधारकांना त्या ठिकाणावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यालगत दोन्ही कडून असणाऱ्या हातगाड्या यातुन मार्ग काढणे कसरतीचे होत आहे.मनपा पाणी पुरवठा ठेकेदाराने रस्त्यावर टाकलेली माती रोड लेव्हलला टाकून दुरुस्त करावी.जेणे करून वाहन धारकांना त्रास सहन करावा लागणार नाही अशी मागणी नागरिकांन कडून जोर धरत आहे.