--पूर्ववैमनस्यातुन बापलेकाच्या डोक्यात लोखंडी सळईची उपट घालून गंभीर जखमी केल्याची घटना खालापुर तालुक्यातील खैराट येथे घडली आहे.जखमींना कामोठे येथील एमजीएम हाॅस्पिटलात दाखल करण्यात आले आहे.
खैराट गावत राहणारे केशव आखाडे यांचे गावातील काही व्यक्तिसोबत वाद झाले होते. त्या
रागातुन निलेश आखाडे, गणेश आखाडे, रवींद्र आखाडे, गोविंद भागा, शांताबाई निलेश आखाडे, केशव यांच्या घरासमोर जमा झाले. निलेश याने केशवला फोन करून घराबाहेर बोलावुन केशव आखाड़े या व्यक्ति ळा मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सोबत असलेल्या इतरानीं देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. निलेश याने लोखंडी सळईची उपट केशव याचे डोक्यात मारली. केशवला होत असलेली मारहाण पाहून त्याचे वडील दगडुमधे गेले असता रविंद्र याने दगडु यांच्या डोक्यात लोखंडी सळईची उपट मारून दुखापत केली. तसेच शिविगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली. केशव आखाडे याने दिलेल्या तक्रारी वरुन खालापुर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास सहायक पोलिस फौजादर मोहन बहाडकर हे करीत आहेत.