ग्राम पंचायत निवडणुकी मध्ये या वर्षी महिला राज चालणार आहे. त्यामुळे आता महिला वर्ग खरबडून जागी झाली आहे.सर्व महिला एकत्रित येऊन असा निर्णय घेण्यात आला कि आपल्या गावात नळ योजना आली परंतु पाणी आले नाही.घरोघरी नळ फिट केले परन्तु त्याला पानिच येत नाही. ग्रामपंचायत मध्ये कुठला कागद मागितला असता टॅक्स नील करून घेतात, परंतु ग्रामपंचायत मार्फत गावकऱ्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागत याकडे लक्ष नसते, त्यामुळे चांडस येथील महिलांनी मालेगाव पंचायत समिती येथे आधी निवेदन सादर करून दि 9 डिसेंबर रोजी घागर काळशी घेऊन धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. प. समिती येथे यांनी दि 12 डिसेंबर रोजी चांडस येथे येऊन आम्ही संपूर्ण टिम सह सखोल चौकशी करून यांचे उत्तर देण्यात येईल, असे आश्वासन महिला वर्गांना देण्यात आले.तेव्हाच महिला वर्ग यांनी प समिती येथून प्रस्थान करण्यात आले.