मुबंई :- ८ डिसेंबर (दीपक परेराव )महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते माननीय नामदार अंबादास दानवे यांना आज (दि.८ डिसेंबर) वाढदिवसानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊतजी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगनजी भुजबळ,दिलीप वळसे पाटील, शिवसेना ज्येष्ठ नेते सुभाषजी देसाई, सचिव मिलिंदजी नार्वेकर, मुंबई कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, नसिमजी खान, आमदार कपिल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रकाशजी रेड्डी या सर्व मविआच्या प्रमुख नेत्यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत, उदंड व निरोगी आयुष्य लाभो व अशाच प्रकारे आपल्या हातून सर्वसामान्य जनतेचे समाजहिताचे कार्य घडत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली.