बीड प्रतिनिधी )
देशाचे कणखर आणि लोकप्रिय नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात गुजरात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला असून, सलग 25 वर्ष तेथील जनतेने विश्वास व्यक्त करत भाजपाच्या हाती पुन्हा सत्ता दिली आहे. मोदींचे गुजरात मॉडेल यशस्वी ठरले. आजच्या रेकॉर्ड ब्रेक निकालामुळे देशभरातील कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे. विकासाच्या राजकारणाचा नवा आदर्श निर्माण झाला. प्रत्येक घटकाच्या विकासासाठी दूरदृष्टीने राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य आणि नाव देशाच्या काना कोपऱ्यात पोहचले. सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास या मंत्राचे प्रत्यक्ष कृतीत आचरण होत असल्याने तृष्टीकरणाच्या राजकारणाचा ऱ्हास होत आहे. प्रखर राष्ट्रप्रेम व सर्वांगीण विकास हा ध्यास बाळगून देशभरात मोदींचे अहोरात्र कार्य चालू आहे. गुजरात मधील विजय हा खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांच्या परिपूर्ण नेतृत्वाचा ऐतिहासिक विजय आहे. असे गौरोद्गार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केले.
आज गुजरात विधानसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या विजयाच्या जल्लोष संघर्ष योध्दा भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय बीड येथे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला.
याप्रसंगी प्रा.देवीदास नागरगोजे, सर्जेराव तांदळे, किरण बांगर, अजय सवाई, डॉ.लक्ष्मण जाधव, अनिल चांदणे, प्रा.सचिन उबाळे, मनोज ठाणगे,डॉ.अभय वनवे, डॉ.जयश्री मुंडे, हरीष खाडे, मीरा गांधले, नरेश पवार, शिवराम शिरगिरे, बाबुराव कदम, सचिन आगाम, सुग्रीव डोके, महेश सावंत, बद्रीनाथ जटाळ, भीमा तुपे, प्रशांत सानप, बाबूलाल ढोरमारे, सुरेश माने, शरद बडगे, रवींद्र कळसाने, सचिन जाधव, सुदर्शन सानप, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.