रत्नागिरी : तालुका बौद्धजन पंचायत समिती व भारतीय बौद्ध महासभेतर्फे (मिराताई आंबेडकर प्रणित) दोन्ही संस्थांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी रात्री ठीक १२ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी तालुका बोध्दजन पंचायत समिती तालुका रत्नागिरी व भारतीय बौद्ध महासभा (मिराताई आंबेडकर प्रणित) तालुका शाखा रत्नागिरी या दोन्ही संस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ५ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजता रत्नागिरी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाळा अर्पण करून पंचशील पठण करून दोन्ही संस्थांच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात येणार आहे.

दरम्यान महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा परिसर सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरु आहे. डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग भिंतीवर चित्रित करण्यात आले आहेत. मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने हे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. सुशोभिकरणाचे कामाला अनेक आंबेडकरी संघटनानी विरोध दर्शवला होता. 

सदरचा अभिवादन कार्यक्रम संयुक्त उत्सव कमिटीचे अध्यक्ष व सामाजिक चळवळीतील धडाडीचे नेतृत्व अध्यक्ष प्रकाश रामचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी संयुक्त समितीचे सेक्रेटरी व्ही. बी. मोहिते, संयुक्त समितीचे कोषाध्यक्ष नरेंद्र आयरे, उपाध्यक्ष तुषार जाधव सहसचिव सुहास विनायक कांबळे, भगवान जाधव, तु. गो. सावंत, विजय आयरे, रत्नदिप कांबळे, शिवराज जाधव, प्रितम आयरे, विलास कांबळे, मंगेश व्ही. सावंत, कृष्णा जाधव, दिपक जाधव, दिपक पवार, रविकांत पवार, दिनकर कांबळे, किरण मोहिते, इ. प्रमुख पदाधिकारी, बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.