राज्यासह देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू व्हावा या मागणीसाठी जिंतूरात समस्त हिंदू समाजाकडून भव्य असा मुक मोर्चा काढण्यात आला.
सध्या दिल्ली येथील आफताब पुनावाला याने तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये असणाऱ्या श्रद्धा हिचा अमानुष खून करून तिच्या प्रेताची विल्हेवाट लावली हे प्रकरण तब्बल सहा महिन्यानंतर उघडकीस आले.यातील आरोपी आफताब पुणावाला यास फाशीची शिक्षा देण्यात यावी,लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा राज्यासह देशात लागू करावा या मागणीसाठी आज रविवार रोजी सकाळी 10वा. येलदरी रोड वरील संत भगवान बाबा चौक येथून जि. प. हायस्कूल मैदानापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला. शहरासह तालुक्यातील असंख्य हिंदू बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.जि.प. शाळेच्या मैदानावर हिंदू बांधवांच्या वतिने तहसील प्रशासना मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.