निवासी मूकबधिर विद्यालय अनसिंग येथे जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त अखिल भारतीय अपंग कामगार संघटना ,व छलाबाई अपंग सेवा आयोजित व निवासी मूकबधिर विद्यालय अनसिंग यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लॅंकेट, कुबड्या व इतर साहित्याचे आज 3 डिसेंबर रोजी वाटप करण्यात आले .

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

    अखिल भारतीय अपंग कामगार संघटना व वच्छलाबाई अपंग सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निवासी मूकबधिर विद्यालय अनसिंग,ता.वाशीम याठिकाणी जागतिक अपंग दिनी (३ डिसेंबर) कुबड्या वाटप,काही दिव्यांगांना थंडी निमित्त अंगावर पांघरून घेण्यासाठी ब्लंकेट वाटप करण्यात आले.भारत देशातील व सर्व राज्यातील तसेच विविध उद्योगातील असलेल्या अनुसूची प्रमाणे काम करणारे सर्व कामगार व दिव्यांग कामगार व कर्मचारी यांची संघटना म्हणून अखंड भरता मध्ये अखिल भारतीय अपंग कामगार संघटना ओळखले जाते.त्याच प्रमाणे त्यांची गाऱ्हाणी दूर करण्याचे प्रयत्न करणे, दिव्यांगाना एकत्रित आणणे,सदस्यांना त्यांच्या जीवन मानात आणि सेवेत सुख शांती प्राप्त करून देणे . कामगारांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न करणे , रोजगारामध्ये किंवा अनुशंगाने उद्भवणाऱ्या बाबीमध्ये सदस्यांना निधीसाहाय्य देणे असे प्रचंड कामगाराच्या न्याय हक्कासाठी ही संघटना काम करत असते . महाराष्ट्र शासन आणि कामगार आयुक्त कोंकण विभाग कार्यालय बांद्रा , मुंबई यांच्याकडून रजिस्टर असून महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असणारी संघटना दिव्यांगाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असते.तसेच कोरोनाची महामारी पसरलेली होती त्या काळात देखील आमच्या अखिल भारतीय कामगार संघटनेने अनेक कामगारांची घर बसल्या मदत पुरवली.तर अनेक शासनाचे कायदे दिव्यंगा करता निघाले परंतु जे यापासून वंचित राहिले आहेत अश्या गरजू दिव्यांगांसाठी अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने दिव्यांगांना कुबड्या वाटप , दिव्यांगांना थंडी निमित्त अंगावर पांघरून घेण्यासाठी ब्लंकेट वाटप करन्यात आले. यावेळी उपसभापती अशोक डोंगर दिवे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे ठाणेदार टाले साहेब यांनी दिप प्रज्वलन करून डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.दिव्यांग बांधवांना ब्लॅंकेट व कुबड्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाला शाळेचे सहसचिव चंद्रकांत देवळे, मुख्याध्यापक नितीन कोल्हे व सर्व शिक्षक तसेच उपसभापती अशोक डोंगरदिवे, टाले साहेब, केशव कांबळे ,दीपक भाऊ डोंगरे, सुखदेव रामेश्वर राठोड, गोटे साहेब, कामगार निरीक्षक अरुण साहेब, कामगार कल्याण आयुक्त श्याम बाराहाते, संदीप जाधव ,दीपक डोंगरदिवे, शिवाजी नवगनकर राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय कामगार संघटना व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थिती होती यावेळी सर्व दिव्यांग बांधव व उपस्थितांना भोजनदान देवून कार्यक्रमाची सांगता झाली.