रत्नागिरी,( वा.) कोकणातील अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरतर्फे कोरोनानंतर पुन्हा एकदा वंध्यत्वावरील मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. तोरल शिंदे रुग्णांची तपासणी करणार आहेत. येत्या रविवारी (ता. ४) पहिले शिबिर सुरू होणार आहे.

सन २०१४ मध्ये कोकणातील पहिले अत्याधुनिक रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर सुरू झाले. यामुळे वंध्यत्वाचा शाप घेऊन जगणाऱ्या अनेक महिलांना मोठे वरदान प्राप्त झाले. गेल्या ८ वर्षात रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अनेक महिलांनी मातृत्वाचा आनंद घेऊन आपले कुटुंब पूर्ण केले आहे. अनेक जोडप्यांनी विनाखर्च, कमी खर्चातसुद्धा अपत्यप्राप्तीचा आनंद घेतला आहे. कोरोनाच्या तब्बल दोन वर्षांच्या कालखंडात ही शिबिरे बंद झाली होती. आता पुन्हा शिबिरे सुरू होणार आहेत.

धन्वंतरी रुग्णालयात रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत मोफत तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी उपचाराची आवश्यकता असल्यास रत्नागिरी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपलब्ध पर्यायांची माहिती दिली जाते. पीसीओडी संदर्भातील समस्या, गर्भनलिका तपासणे, स्त्रीबीज तयार न होणे व न फुटणे, गर्भाशयाच्या गाठी व गर्भाशय काढणे, वारंवार आययूआय, टेस्ट ट्यूब बेबी यशस्वी न होणे, गर्भ रूजू न होणे, वारंवार होणारे गर्भपात, पाळीच्या तक्रारी, स्त्रियांचे वजन आणि त्यामुळे येणाऱ्या समस्या, पुरुषांमध्ये असलेली शुक्राणूंची संख्या व हालचाली कमी असणे, सर्व प्रकारच्या लैंगिक समस्यांवर डॉ. तोरल शिंदे या शिबिरामध्ये मोफत मार्गदर्शन करणार आहेत.

हे शिबीर आता ४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत धन्वन्तरी रुग्णालयात होणार असून या शिबिराचा निपुत्रीक जोडप्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन धन्वंतरी रूग्णलयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरीत 02352-221282, 02352- 355059, 9527044901 या क्रमांकावर संपर्क साधावा.