शिरूर कासार:- तालुक्यात अल्पावधीतच नावारूपाला आलेली आणि ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या सिंदफणा अर्बन बँकेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.दुसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून संस्थापक अध्यक्ष आजीनाथ गवळी यांच्या संकल्पनेतुन ग्राहकांसाठी सिंदफणा विमा सुरक्षा कवच योजनेला सुरुवात करण्यात आली.
या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री हे तर प्रमुख पाहुणे म्हणून इंदुवासिनी संस्थान पिंपळनेरचे महंत त्रिविक्रमानंद शास्त्री,श्रीराम संस्थानचे महंत भानुदास महाराज शास्त्री,दिलीप महाराज पवार,जि.प.सदस्य रामदास बडे,भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चंपावती पानसंबळ,दिगांबर मळेकर,पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने,बँकेच्याअध्यक्षा सौ.वैशालीताई गवळी,श्रीम.संतोषी माने,कल्याण तांबे,मिनाताई उगलमुगले,लक्ष्मीबाई गवळी,मिनाताई गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.अध्यक्षीय भाषणात महंत विवेकानंद स्वामी महाराज म्हणाले की बॅंकेने समाजाचे हित जोपासत अप्लावधीतच ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.तर प्रास्ताविकपर भाषणात सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा सादर केला.कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या संकटात जग सापडलेले असताना बँकेने ठेवीदारांचा विश्वास कायम ठेवून बँकेची प्रगती साधली.आजघडीला बँकेचे चार हजार पेक्षा जास्त सदस्य असून सर्व वयोगटातील लाभार्थ्यांसाठी बँकेच्या योजना असल्याचे देखील ते म्हणाले.या वेळी उपस्थित मान्यवरांनी बँकेच्या दोन वर्षातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी या कार्यक्रमाला पो.उप.निरिक्षक खटावकर,ग्रामीण बॅंक मॅनेजर रूपेशहेडाऊ,विशाल जावळेसर,प्रकाश बडे,बबनराव चौधरी,दत्ता पाटील गाडेकर,आरूण भालेराव,अर्जुनदादा गाडेकर,अक्षय रणखांब,गोकुळ सवासे,किशोर खोले,राजकुमार पालवे,भगवान पाखरे,सुंदरराव जेधे,भागवत दादा काकडे,नवनाथ भोसले,आप्पासाहेब येवले,विनोद काकडे,हानुमंत डोंगर,याशीनभाई शेख,अशोक मोरे,सावळेराम जायभाये,गोपाल भुसारे,डॉ.भगवान सानप,डॉ.विवेकानंद ढाकणे,बाळासाहेब नागरे,उद्धव सोनटक्के,संजय ढाकणेसर,दत्तु सिरसाठसर,रमेश सिरसाठसर,आभिमान कातखडेसर,सुदाम पवारसर,प्रशांत देवा गंभीरेसर,दत्तु सुरे,महादेव पवार,बापूराव जेधे,शरद
ठोंबरे,अमोल पाखरे,महारूद्र उगलमुगले,पो.कॉ.हानुमंत साकुंके,मोकशी,रवि शिंदे,पिनु जगताप,पो.कॉ.तुपे,तुषार जेधे,संतराम वीर,बाबासाहेब दिवटे,भारत बनकर,कृष्णा बारगजे,भगवान कदम,भागवत पाटील चौधरी,गणेश यादव,राहुल गवळी,अंकुश गवळी,बबन कातखडे,हानुमान गवळी,तसेच भारत पानसंबळ,जगन्नाथ परजणे,गोकुळ सानप,प्रकाश साळवे,अशोक जायभाये,बबलु माने यांचेसह ग्राहकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेअरमन सौ.वैशालीताई गवळी,व्हा.चेअरमन सुरेंद्र भांडेकर,सचिव-सौ.सुवर्णाताई कातखडे,संचालक बबनराव सुरे,रमेशजी जरांगेसर,भागवत मानेसर,गणेश बेदरे,अँड.भारत जायभाये,गोकुळ पवार ,संजय तुपे,महादेव कातखडेसर,कु.योगीता गवळी यांचेसह व्यवस्थापक-आकाश काकडे,कॅशीअर-महेश चव्हाण,क्लार्क-राज माने,नाथा कासूळे,श्रीराम डोके,नारायण खोले,रोहीत जाधव,कचरू गायकवाड यांनी परिश्रम घेतले.