पाटोदा (गणेश शेवाळे) गुरुगोविंदसिंघजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या नांदेड मधील प्रभाग क्र.१७ मध्ये पवित्र गुरुद्वाऱ्याचा परिसर येतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, प.पु. बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भगवान महावीर यांचे मंदीर, हनुमान मंदिर, शितलादेवीचे मंदिर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा, महाकाली मातेचे मंदिर, पोच्चम्मा मातेचे मंदिर, असून ह्या परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हा परिषद परिसर,मा. जिल्हा व सत्र न्यायालय, पोलीस अधिक्षक कार्यालय,पोलीस अधिक्षक निवासस्थान, शासकीय दवाखाना, खाजगी डॉक्टरांची वसाहत, मा.धर्मादाय आयुक्तांचे कार्यालय,जीएसटी भवन, भगवान महावीर स्तंभ, जिल्हा परिषदेची मल्टीपर्पज हायस्कूल, के.आर.एम.महिला महाविद्यालय, आंध्रा समिती स्कूल, गुजराती हायस्कूल, जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल असे अनेक महत्त्वाचे स्थळ असताना ही ह्या भागात सहज पणे दारु मिळत असल्याने लहान मुले मुली व महिला भगिनींना प्रचंड ञास सहन करावा लागत असल्यामुळे शितल भवरे यांनी ह्या भागात दारूमुक्त करण्यासाठी भवरे यांनी "दारूबंदी अभियानाचा लढा उभारला असून एका सामान्य कुटुंबातील मुलींनी उभारलेला आहे हा लढा महाराष्ट्रभर उभारण्यासाठी राज्य भरातील महिला मुलीनी व सामाजिक कार्यक्रत्यांनी शितल भवरे यांनी दारुबंदी महिला महासंघ या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून या संस्थेद्वारे सर्व प्रथम भवरे यांनी नांदेड जिल्ह्यात बाटली आढवी करण्यासाठी लढा उभारला आहे. राज्यभरात हाजारो युवकांचे संसार वाचवण्यासाठी ह्या लढ्याचे चळवळीत रुपातर होवावा म्हणून महाराष्ट्र शासनाचे दारूबंदी अभियान राज्य भरात राबवण्यासाठी दारुबंदी अभियान महिला महासंघाच्या मुख्य प्रवर्तक शितल भवरे यांच्या लढ्यात महाराष्ट्रराज्य भरातील मुली महिला बहिणींनी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन हजारो कुटुंबाचे संसार वाचवण्यासाठी सहकार्य करण्याची गरज समाजातील सध्याची परिस्थिती पाहून जाणवत आहे