नाशिक: नाशिक शहरासह ग्रामीण भागात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नाशिकच्या सिन्नर भागात तर बिबट्याने अक्षरशः दहशत निर्माण केली असून नागरिक घराच्या बाहेर पडण्यास घाबरत आहे. त्यातच आता शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणारा पोल्ट्री व्यवसाय देखील बिबट्यामुळे अडचणीत आला आहे.
सिन्नरच्या कासारवाडी येथील देशमुख यांच्या पोल्ट्रीत बिबट्याने धुडगूस घातला आहे. घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोल्ट्रीची जाळी तोडून बिबट्याने पोल्ट्रीत प्रवेश करून 200 हून अधिक कोंबड्या फस्त केल्या आहे. यामध्ये वैभव देशमुख या पोल्ट्री चालकाचे मोठे नुकसान झाले आहे. या घटणेने पोल्ट्री व्यवसाय शेतकारी वर्गात भीतचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसेंदिवस नाशिकच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्याला जोडधंदा करणारे अडचणीत सापडत आहे. यापूर्वी मेंढपाळ, शेळीपाळन आणि आता पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना बिबट्याचा मोठा फटका बसत आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय जोडधंदा म्हणून शेतकरी करत आहे.
शेतीत नुकसान झाले तर दिलासा म्हणून हा व्यवसाय महत्वाचा ठरत असतो. मात्र, नाशिकच्या ग्रामीण भागातील पोल्ट्री व्यावसायिक सध्या भीतीच्या वातावरणात वावरत आहे, नुकतेच बिबट्याने मोठा धक्का एका पोल्ट्री व्यावसायिकाला दिला आहे. पोल्ट्री व्यावसायिक वैभव देशमुख यांचे पोल्ट्री फार्म आहे, रविवारी रात्रीच्या वेळी बिबट्याने पोल्ट्रीची जाळी तोडून पोल्ट्रीत प्रवेश केला होता. अचानक बिबट्या कोंबडयांना दिसल्याने कोंबड्या बिथरल्या होत्या.
पोल्ट्रीत जीवांच्या आकांताने पळत होत्या. मात्र बिबट्याने दोनशेहून अधिक बिबट्यांचा फडशा पाडला होता. मध्यरात्री जोरजोरात आवाज झाल्याने पोल्ट्री चालक वैभव देशमुख यांनी पहिले असता बिबट्याने धूम ठोकली होती, मात्र तोपूर्वी अनेक कोंबड्या मृत झाल्या होत्या. या घटनेची जोरदार चर्चा होत असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली असून देशमुख यांचे मोठे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.