इसारवाडी ते बिडकिन रोडवर आयशर टेम्पो व मोटारसायकल धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार..

ईसारवाडी ते करमाड महामार्गांवर अपघाताची संख्या वाढत चालल्याने वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर ‌...

बिडकिन प्रतिनिधी:-

ANC..काल दि.२६ रोजी रात्री अंदाजे ७ ते ८ वाजेच्या सुमारास ईसारवाडी फाटा ते बिडकिन रोडवरील शिवपुर फाट्याजवळ आयशर टेम्पो व मोटारसायकल च्या धडकेत 38 वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून स्थानिक नागरिकांच्या वतीने ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे दाखल करण्यात आले होते.

Vo..ईसारवाडी फाट्याकडुन शेंदुरवादा कडे जाणारी स्कुटी मोटारसायकल क्रं.एम एच १५ बी.टी.६७५६ व शेंदरवादा कडुन भरघाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रं एम.एच.२० ए.टी.७१९२ यांच्यात झालेल्या जोरावर धडकेत दुचाकीस्वार अनिल बाबुराव देहाडे, वय ३८ वर्षे,रा.शाहुनगर,पेपर मिल ईसारवाडी ता.पैठण असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.अनिल देहाडे हा एका खाजगी कंपनीत मार्केटिंग चे कामकाज करत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. स्थानिक पोलिस ठाण्याचे कर्मचारी व नागरिकांच्या मदतीने मृतदेह हा खाजगी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे दाखल करण्यात आला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ संजय गोरे यांनी तपासुन मयत घोषित करण्यात आले होते.आज दि.२७ रोजी घटनेच्या हद्दीतील वाळुज पोलिस ठाणे अंतर्गत सहायक पोलिस निरीक्षक हनिफ सय्यद यांनी पंचनामा करत ग्रामीण रुग्णालय बिडकिन चे वैद्यकीय अधिकारी डॉ संजय गोरे यांनी शवविच्छेदन केले असुन मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.सदरिल घटनेचा तपास वाळुज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हनिफ सय्यद हे करित आहेत..