शिरुर: रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे संविधान दिनाचे औचित्य साधुन मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरुर तालुक्यातील MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 11 विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, जिल्हाध्यक्ष संतोष कुटे, शिरुर तालुका कायदा सल्लागार मीना गवारे, तालुका कार्याध्यक्ष शहाजी खळदकर, तालुका उपाध्यक्ष वैशाली बांगर, तालुका संपर्क प्रमुख पत्रकार किरण पिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविता खेडकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, ग्रामपंचायत सदस्य प्रताप फंड, अनिता बांदल, दत्तात्रय हरगुडे, श्रीकांत पाचुंदकर, विवेक फंड, भानुदास शेळके तसेच ग्रामस्थ, मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात 26/11 हल्ल्यात मृत पावलेल्या शहीदानां श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर मानव विकास परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालय, शिक्रापुर, शिरुर आणि रांजणगाव MIDC तील पोलिस ठाण्यात जाऊन संविधानाच्या प्रती पोलिस कर्मचाऱ्यांना प्रति वाटण्यात आल्या.