परभणी, दि. २६ : संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात 'भारतीय संविधाना'च्या प्रास्ताविकेचे वाचन करत उपस्थितांना शपथ देण्यात आली. 

निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, नायब तहसीलदार शेख वसीम आणि प्रशांत वाकोडकर यांच्यासह अधिकारी -कर्मचारी यावेळी उपस्थित होते. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने ते स्वीकारले आणि २६ नोव्हेंबर १९५० पासून ते लागू करण्यात आले. संविधानाचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो.