मुंबई :- (दीपक परेराव)मुंबई बँक मजूर प्रवर्गातून मुंबई भाजप उपाध्यक्ष तसेच १० वर्षे नगरसेवक राहिलेले, आ. प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणी कालच आप राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत प्रकाश दरेकर यांच्या मजूर नसण्याचे पुरावे देखील सादर केले. याचाच एक भाग म्हणून आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली तसेच याप्रकरणी सभागृहात त्यांनी आवाज उठवावा यासंबंधी निवेदन दिले.

मागे आपने या प्रकरणावर आवाज उठविला असताना आ. प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातून आपली उमेदवारी बदलून इतर गटातून संचालक पद मिळविले परंतु आता शिंदे - फडणवीस भाजप सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी तोच कित्ता गिरवून आपल्या बंधूंना मजूर प्रवर्गातून संचालक बनविण्याचा घाट घातला आहे. घराणेशाहीचे तत्वज्ञान पाजळणारे भाजप नेते मात्र मूग गिळून गप्प आहेत.

"आज आम्ही विधानसभा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. त्यांना मुंबई बँकेतील गैरव्यवहार तसेच बोगस मजूर संचालक प्रकरनांची माहिती दिली. आम् आदमी पक्ष सभागृहाबाहेर ही लढाई कसोशीने लढत आहे परंतु आपण सभागृहात या प्रकरणाला वाचा फोडावी अशी विनंती केली व त्यासंबंधी निवेदन दिले. त्यांनी याची दखल घेत जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.", धनंजय शिंदे, आप राज्य सचिव.