गंगाखेड (प्रतिनिधी) :-
रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह विविध प्रश्नांवर धोरणात्मक काम करून गंगाखेड विधानसभेचा कायापालट करणारे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अथक प्रयत्नातून गंगाखेड व पालम तालुक्यातील तब्बल १८८.५०० कि.मी जिल्हा महामार्ग रस्त्यांना आता राज्य महामार्ग दर्जा प्राप्त झाला आहे. तसे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच काढले आहेत.
त्यानुसार पारधेवाडी-उखळी (खु)- हरगुळ-खादगाव-
अकोली-इसाद-ढवळकेवाडी-मालेवाडी-झोला-पिंपरी- सांगवी भुजबळ-रावराजुर-
उमरथडी,बनवस-तांदुळवाडी-पोखर्णी फाटा-राणीसावरगाव-
पिंपळदरी-वाघदरी-अंतरवेली-हेळंब,रावराजुर-सिरपूर-पालम-पुयणी-आडगाव-वनभुजवाडी-चाटोरी-बोरगाव (बु)- उरवंडी-बोथी या रस्त्यांचा समावेश आहे. त्यांना अनुक्रमे राज्य मार्ग ४४२, ४४३, ४४४ असे नवे क्रमांक देण्यात आले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेल्या आदेशाच्या अंमलबजावणी नंतर परभणी जिल्ह्यातील राज्यमार्ग दर्जाच्या रस्त्यांच्या एकूण लांबीत १८८.५०० कि.मी रस्त्यांची वाढ झाली असून आता २६१४.८५० कि.मी. झाली आहे. त्यामुळे रस्ते सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच येत्या काही महिन्यात त्या सर्व रस्त्याचे काम सुरू होणार असून लोकांचे दळणवळण सुलभ होण्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान, यापूर्वीही आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी रस्ते, पूल, सभागृहे, मंदिर, संरक्षक भिंत, स्मशानभूमी, शादीखाना, समाज मंदिरे अशा विविध विकास कामांसाठी वेळोवेळी कोट्यावधींचा निधी खेचून आणला आहे. तसेच पालम न्यायालयाच्या इमारत आवारात पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी नुकतेच तब्बल ३ कोटीचा निधी मिळविला आहे. त्यात गंगाखेड व पालम तालुक्यातील वर्दळीच्या रस्त्यांना राज्य महामार्ग दर्जा मिळाल्यामुळे आदेश आल्याने मतदार संघातील नागरिक, महिला व व्यापारी आ.डॉ.गुट्टेंचे तोंडभरून कौतुक करीत आहेत.
चौकट...
शिंदे-फडणवीस सरकारचे आभार - आ.डॉ.गुट्टे
नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने गंगाखेड विधानसभा मतदार संघावर विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे पायाभुत सुविधांसह अनेक विकासकामे मार्गी लागत आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असणारे प्रश्न सुटत आहेत. त्यासाठी आवश्यक तो निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. आता जिल्हा मार्गाना राज्यमार्ग घोषित करुन शासनाने विकासास हातभार लावला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचे जाहीर आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आ.डॉ.गुट्टे यांनी भ्रमणध्वनीद्वारे दिली आहे.