महाऊर्जाच्या वतीने जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
उज्वल भारत, उज्वल भविष्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन
गडचिरोली,(महाराष्ट्र )दि.04: -स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षा निमित्त ऊर्जा विभागाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव राबविण्यात आला. त्या अंतर्गत महाऊर्जा जिल्हा कार्यालय, चंद्रपुर मार्फत चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यात दि.25 जुलै ते 31 जुलै 2022 दरम्यान राबविण्यात आले. चंद्रपुर जिल्ह्यातील जिल्हा नियोजन कार्यालययेथे 50 कि.वॅ.क्षमतेचे प्रकल्प व मागास वर्गीय मुलांचे वसतिगृह येथे 50 कि.वॅ.क्षमतेचे प्रकल्प आस्थापित झाले असुन येथे राबविण्यात आले या वेळी महाऊर्जाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.अनिल बी.ओंकार यांनी प्रकल्पाची माहिती दिली. या वेळी सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.कुमरे साहेब यांनी सौर प्रकल्पामधून विजेची बचत होऊन शासनाचे भरपुर पैसे बचत झाले व कार्बन डायऑक्साईड चे प्रमाणे कमी होऊन निसर्गाला हानी होण्यास टळेल असे सांगितले तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालययेथे 15 कि.वॅ. क्षमतेचे सौर विद्यूत प्रकल्प आस्थापित झाले असुन त्यापासून शासनाचा भरपुर प्रमाणात महसूल वाचला व पारंपारिक उर्जेचा वापर कमी झाला त्या मुळे पाणी व कोळसा वाचेल व कार्बनडाय ऑक्साईड चे उत्सर्जन कमी होईल असे सहाय्यक अधिक्षक श्री. संतोष कांडलकर दिवाणी व फौजदारी न्यायालय यांनी सांगितले.तसेच कुसूम-ब योजना अंतर्गत गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यातील विविध गावामध्ये आस्थापित झालेले सौर कृषी पंपांची माहिती डॉ. अनिल बी.ओंकार, व्यवस्थापक, जिल्हा कार्यालय, चंद्रपुर; प्रकल्प अधिकारी सुशिल शिलाम व आकाश निरकूलवार यांनी प्रत्यक्षला भार्थी यांना भेट देवून प्रकल्पाचे फायदे व त्यांना या पासून झालेली विजेची बचत व शेतक-यांना फायदा कसा झाला याबाबत संवाद साधला. तसेच चंद्रपुर व गडचिरोली येथील शाळामंध्ये व इंजिनिअरींग कॉलेज मध्येम हा ऊर्जाच्या वतीने कार्यक्रम राबविण्यातआले, अपारंपारीक ऊर्जा योजनेअंतर्गत ऊर्जा संवर्धन व ऊर्जाबचत, प्रधानमंत्रीकुसुम-ब योजना, पाणी पुरवठा योजना, सौर ऊर्जेवर करणे, सौर उष्ण जलसंयंत्रे, स्वयंपाकासाठी आवश्यक उपकरणे, सौर ऊर्जेवर राबविणे ग्रामीण विद्युती करण आदिंची माहिती या वेळी देण्यात आली. डॉ. अनिल बी.ओंकार यांनी ऊर्जा संवर्धन व ऊर्जा बचत या विषयावर शासकिय अभियांत्रिकी कॉलेज, चंद्रपुर व साई अभियांत्रिकी कॉलेज, भद्रावती येथे परिसंवाद कार्यक्रम करण्यातआले व उर्जेची बचत कशा प्रकाचे करण्यात येईल व जिवनात याची गरज किती महत्वाची आहे या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच प्रकल्प अधिकारी रोशन मानकर, सुशिल शिलाम, आकाश निरकुलवार व विनय सरोदे यांनी महाऊर्जाच्या विविध योजना बद्दल माहिती सांगितली व या योजनांचा शासकीय कार्यालय, वैयक्तिक, शेतकरी यांना लाभ मिळेल याबाबत मार्गदर्शन केले.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भरपुर प्रश्न विचारले व त्याचे योग्य ते उत्तर महाऊर्जाच्या अधिका-यांमार्फत देण्यातआले.यावेळी शासकीय अभियांत्रिकी कॉलेज, चंद्रपुरयेथील डॉ.अनंत देशपांडे ,विद्युत विभाग प्रमुख डॉ.राजूरकर यंत्र विकास प्रमुख तसेच साईअभियांत्रिकी कॉलेज भद्रावती येथील प्राचार्य डॉ.गोरंटीवार उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे राज्यात अपारंपारिक उर्जेचा वापर भरपुर प्रमाणात करण्यात यावा व शासनाच्या योजना महाऊर्जा मार्फत राबविले जाणार व याचा फायदा राज्यातील लोकांना होईल, असे जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल बी.ओंकार यांनी सांगितले.सदर कार्यक्रम प्रादेशिक संचालक श्री. वैभव कुमार पाथोडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला व महाऊर्जा तर्फे राबविण्यात येण्याच्या विविध योजनांचा नागरिकांनी भरपुर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.