*रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पालम शहराध्यक्ष पदी पठाण सलमाण खान रहमत खान याची निवड*   

 पालमः- प्रतिनिधी रुग्णाचा न्याय व हक्काचा संरक्षणार्थ संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत असणारी एकमेव समिती रुग्ण हक्क संरक्षण समिती या समितीच्या परभणी जिल्ह्यातील पालम शहराध्यक्ष पदी पठाण सलमाण खान रहमत खान यांची नियुक्ती समिती प्रमुख ॲड.निलेश करमुडी, प्रदेशअध्यक्ष हनमंत गोत्राळ ,प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या सुचनेने पालम तालुकाध्यक्ष प्रसाद पौळ यांनी जाहीर केली. सदर निवडी बद्दल नवनियुक्त पालम शहराध्यक्ष पठाण सलमान खान यांचे अभिनंदन प्रदेश संपर्कप्रमुख विनोद इघवे, प्रदेश संघटक नरेंद्र बोरा, महिला अध्यक्षा रेणुका बोरा, परभणी महिला जिल्हाध्यक्ष अनिताताई सरोदे , परभणी जिल्हा उपाध्यक्ष रमेश घनघाव,जिल्हा संपर्कप्रमुख रहीम शेख, जिंतुर तालुकाध्यक्ष फिरोज सय्यद, जिंतुर महिला तालुकाध्यक्ष कविताताई घनसावंत, सुरेखाताई खिल्लारे, आदि सर्व समिती पदाधिकारी यांनी अभिनंदन केले..