पाटोदा (प्रतिनिधी) शासकीय गायरान ताब्यात घेण्याचा तुघलकी निर्णय पारीत झालेला असल्यामुळे शासकिय गायरानात राबराब राबवून आपल्या कुटुंबाची उपजिवीका भागवत असणाऱ्या कुटुंबावर यामुळे आभाळच कोसळले असुन गायरान आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे हा एकच नारा सध्या निघत असुन गायरान धारकांना लोकशाही मार्गाने न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरण्यात येणार असुन या आंदोलनाला बीड जिल्ह्यातील गायरानधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रिपाईचे युवक शहर उपाध्यक्ष शाम वीर यांनी केले आहे.
महाराष्ट्रा सह देशभरात गायरान धारकांच्या न्यायिक हक्काच्या आणि अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात रिपाईचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या व युवक प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष मा.पप्पूजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या आंदोलनाची सुरुवात बीडमधून होत असून दिनांक 23 नोव्हेंबर बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती रिपाईचे उपाध्यक्ष शाम वीर यांनी दिली.
जिल्ह्यातील गायरान धारक व अनुसूचित जाती जमाती विरुद्ध होणाऱ्या अन्याया विरोधात बंड पुकारून या सरकारला एक इंच ही शासकिय गायरान जमीन परत न घेऊ देण्यासाठी सर्व लोकांनी बुधवारी तेवीस नोव्हेंबर रोजी बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपाईच्या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवक आघाडीचे शहर उपाध्यक्ष शाम वीर यांनी केले आहे.