परभणी प्रतिनिधी 

पालम तालुक्यातील फरकंडा येथील शेतकरी प्रसाद पौळ यांनी डिग्रस बंधाऱ्याचा मावेजा न मिळालेल्या फरकंडा येथील काही शेतकऱ्यांना मावेजा त्वरित देण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत 15 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई-मेल पाठवून त्यांनी मागणी केली आहे. डिग्रस बंधाऱ्याचा मावेजा फरकंडा येथील काही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे नमूद केले आहे. प्रशासकीय अधिकारी शेतकऱ्यांना मावेजा देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत, नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना मावेजा देण्याबाबत कळविण्यात यावे, अशी मागणी प्रसाद पौळ यांनी इ-मेल मध्ये केली आहे.