दापोली : आरपीआय आठवले गटाकडून २६ नोव्हेंबर या भारतीय संविधान दिनानिमित्त दापोली येथील जॉली स्पोर्ट्स क्लब मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ नोव्हेंबरपासून हे कार्यक्रम सुरू झाले असून २५ नोव्हेंबरपर्यंत संविधान गौरव रथ गावभेट तसेच संविधान प्रत अर्पण कार्यक्रम होणार आहे.

२६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दुपारी २.१५ वा. संविधान प्रतिमेचे पूजन आणि प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन, दुपारी २.३० वा. 'तुझ्या पाऊलखुणा भिमराया' हा कार्यक्रम सादर होणार आहे. सायं. ४.०० वा. मान्यवरांचे स्वागत, सत्कार आणि प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. सायं. ७.०० वा. स्नेहभोजन, सायं. ७.३० वा. संविधानपर आधारित भीमगीतांचा कार्यक्रम कवी/ गायक अनिल जाधव आणि गायन पार्टी कोकण तसेच गायिका सुहासिनी शिंदे, मुंबई आणि गायन पार्टी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका दापोली यांच्याकडुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी प्रितम रुके, स्वागताध्यक्ष राहुल जाधव, प्रस्तावना अनिल जाधव तर सूत्रसंचालन दिनेश रुके व आभार प्रदर्शन सुरेश मोरे करणार आहेत. यावेळी रोशन पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर नगराध्यक्षा ममता मोरे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला गौतम सोनावणे (म.रा. सरचिटणीस), सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, अर्चना येलवे (म.रा. महिला आ. सहसचिव) या मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आरपीआय आठवले गटाच्यावतीने करण्यात आले आहे.