शिरुर: शिरुर आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे युवा उपतालुकाप्रमुख म्हणून अमोल पोकळे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्तीपत्र शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांनी दिले आहे.
लोकसभा मतदारसंघातील सर्व युवासेना पदाधिकारी युवा सैनिक यांची बैठक नुकतीच आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत लांडेवाडी ता. आंबेगाव या ठिकाणी पार पडली. यावेळी युवा सेनेचे विस्तारक सचिन बांगर, जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, युवा सेना जिल्हा चिटणीस वैभव ढोकले उपस्थित होते.
दरम्यान अमोल पोकळे यांना उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी देत त्यांच्यावर शिरुर आंबेगाव तालुक्यातील गावे आणि मतदारसंघ या कार्यक्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.