केज बीड रोडवर सहारा हॉस्पीटलच्या समोर टि.व्ही.एस. कंपनीच्या मोटर सायकलला आज्ञात वाहनचालकाने पाठीमागुन जोराची धडक देऊन पलायन केले आहे.

सविस्तर वृत्त असे कि केज बीड रोडवर सहारा हॉस्पीटलच्या समोर आजर आजीज शेख वय 37 वर्ष व्यवसाय व्यापार रा खाजा नगर केज हे दि. 20 नोव्हेंबर रोजी सांय 06 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन आपल्या घरी मोटर सायकल टिव्हीएस कंपनी क्र.MH44 M5150 वरून जात असताना बीड रोडवर असलेल्या सहारा हॉस्पीटलच्या समोर पाठीमागुन येत असलेल्या विस्टा कंपनीच्या सिल्वर कारच्या आज्ञात चालकाने हयगईने व निष्काळजीपणाने गाडी चालवत पाठीमागुन जोराची धडक देऊन जखमी करून फिल्मी स्टाईलने पलायन केले म्हणुन केज पोलिस ठाण्यात आजर आजीज शेख यांच्या फिर्यादीवरून गुरन.533/2022 कल्म279,337 भादंवी सह कलम 134 मो.वा.का. प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशाने पोह. शेप . करत आहेत.