अपहरण झालेल्या इसमाचा सहा तासात छडा लावून तीन आरोपीनां ताब्यात घेण्यात पैठण पोलीसांना यश !

औरंगाबाद/ पैठण येथील रजीस्ट्री ऑफीसमध्ये शेत जमिन नावावर करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीस एका ओळखीच्या तर दोन अनओळखीच्य व्यक्तीने एका काळ्या रंगाची ब्रेझा कार मध्ये (दि.३)रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास दिलीप जानु चव्हाण रा.बोकुड जळगाव तांडा यांचे अपहरण करण्यात होते.

 याविषयी सविस्तर माहिती अशी की, कविता दिलीप चव्हाण वय ३५ वर्षे रा.बोकुड जळगाव तांडा ता. पैठण जि.औरंगाबाद यांनी पैठण पोलीस ठाण्यात (दि४)रोजी तक्रार दिली असे म्हटले की, दिनांक ३/८/२२ रोजी दुपारी १.३० वाजेच्या माझे पती दिलीप जानु चव्हाण रा. बोकुड जळगाव तांडा पैठण हे शेती नावावर करण्यासाठी रजीस्ट्री ऑफीस पैठण येथे आले असतांना आमच्या गावातील कृष्णा तरमळे हा काळया रंगाची ब्रेझा कार क्रमांक माहित नाही असे घेवून आले त्यामध्ये दोन अनओळखी पुरुष २५ ते ३० वर्षांचे होते व त्यांनी माझे पती दिलीप जानु चव्हाण यास बळजबरीने टाकून घेवून गेले असल्याने वगैरे मजुकरांचे फिर्यादीचे तक्रारीवरुन पोलीस ठाणे पैठण येथे कलम ३६३, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.या गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस ठाणे पैठण यांचे मार्गदर्शनाखाली पथक पोस्टे पैठणचे पोउपनि सतिष भोसले, पोहेकॉ महेश माळी, पोलीस अमंलदार सतीष खिळे, संतोष चव्हाण, चालक तांबे नेमून रवाना करण्यात आले त्यानंतर गोपनीय बातमीदारा मार्फत व तांत्रीक आधारावर गुन्हयातील अपहरणकर्ते यांचा सहा तासामध्ये छडा लावून अपहरीत झालेली व्यक्ती दिलीप चव्हाण यास सुखरुप सोडवून गुन्हयातील तीन आरोपी नामे १) मारोती मुरलीधर नागे २) रामनाथ मुरलीधर कोल्हे ३) दिनेश प्रमोद राठोड तीन्ही राहणार बोकुडजळगाव तांडा ता. पैठण जि.औरंगाबाद यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयात कृष्णा कल्याण तरमळे, पांडूरंग सदाशिव नागे दोन्ही राहणार बोकुड जळगाव ता. पैठण हे फरार आहेत सदरचे अहपहरण हे ३०-३० आर्थीक घोटयाळयातील पैशाच्या व्यवहारावरून झाले आहे. हा व्यवहार २५ लाखाचा असल्याची चौकशीतून प्राथमिक माहिती मिळत आहे.सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधिक्षक पवन बनसोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहुल यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे (स्था.गु.शा) किशोर पवार पोलीस ठाणे पैठण, पोउपनि सतीष भोसले पोहेकॉ महेश माळी, पोलीस अंमलदार योगेश तरमळे, पोलीस अमंलदार सतोष खिळे, संतोष चव्हाण, चालक पोहेकॉ भाऊसाहेब तांबे यांनी पार पाडली