आपण आपल्या घरामध्ये वापरत असलेला एलपीजी गॅस सिलेंडर आपण वजन करून घेऊ शकतो. बऱ्याचवेळा तुम्हाला अनुभव देखील आला असेल की गॅस कधी खूपच लवकर संपून जातो. म्हणजे आपल्या घरात जी गॅस सिलेंडर येतो त्यामध्ये कधी कधी निर्धारीत गॅस वजनापेक्षा कमी गॅस देण्यात येतो. साधारण कधी कधी १ ते २ किलो कमी येतो. परंतु आता अशी गॅसची चोरी आणि ग्राहकांची होणारी लूट आता थांबणार आहे.

बऱ्याचदा गॅस सिलेंडर डिलिव्हरी करण्यासाठी आलेल्या लोकांना आपण जरी गॅसचे वजन करून मागितले तर ते लोक आपण वजन काटा घेऊन आलो नसल्याचे सांगतात. गॅस सिलेंडरमध्ये निर्धारीत करण्यात आलेल्या प्रमाणातच गॅस असल्याचे सांगतात. परंतु आपण प्रत्येक गोष्टमोजून घेतल्याशिवाय विकत घेत नाही. मग गॅस सिलेंडरचे वजन का करून घ्यायचे नाही. परंतु आपण बऱ्याचदा याच गोष्टींचा विचार करत नसतो आणि समोरची लोक याचाच गैरफायदा घेत असतात.परंतु आता आपल्या घरातील एलपीजी

सिलिंडरमधील गॅसची होत असलेली चोरी आता थांबणार आहे. यासाठी केंद्र सरकार वेगवेगळ्या गॅस सिलेंडरवरच तशी व्यवस्था करणार आहे, जेणेकरून गॅसची चोरी थांबेल आणि ग्राहकांची फसवणूक थांबेल. एलपीजी सिलिंडरमधून  होणारी गॅस चोरी थांबण्यासाठी केंद्र सरकार सिलेंडरचे आधार कार्ड तयार करणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, " आता गॅस सिलिंडरचा आधार तयार करणार आहोत. हे जरी खरे आधार कार्ड नसले, कारण आधार कार्ड माणसांचे तयार होते. परंतु ते आधार कार्ड प्रमाणेच असणार आहे. केंद्र सरकार लवकरच सर्व गॅस सिलिंडरचा QR कोड तयारकरत आहे. त्यामुळे आता गॅस सिलेंडरवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. यामुळे गॅसची चोरी करणारे सापडतील.सव घरगुती गॅस सिलिंडरचा QR कोड तयार केला जाणार आहे. याची अंमलबजावनी सुरू करण्यात आली आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत सर्वच घरगुती गॅस सिलिंडरवर QR कोड देण्यात येईल. जुन्या गॅस सिलिंडरवर QR कोडचे धातूने बनवलेले स्टिकर बसवले जातील, अशी माहिती हरदीप सिंग पुरी यांनी दिली. जे नवीन गॅस सिलेंडर तयार होतील, त्यावर अगोदरच QR कोड असणार आहे. याचाच फायदा घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस चोरांवर आळा बसण्यासाठी होणार आहे आणि सर्वसामान्य ग्राहकांची लूट थांबण्यास मदत होईल.