आष्टी (प्रतिनिधी) श्रीमती शांताबाई कांतीलाल गांधी महाविद्यालय कडा आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने “शिक्षक विद्यार्थी परिचय सत्राचे” आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ज.मो.भंडारी हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन आनंदराव धोंडे महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.सज्जन गायकवाड, डॉ.अशोक माळशिखरे, डॉ.अनिल गर्जे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ.ज.मो.भंडारी यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा अभ्यासक्रम समाजयुक्त आहे, त्यामध्ये अनेक विद्यार्थी वेगवेगळे कोर्स सुरु केलेले असल्यामुळे भारतातील वेगवेगळ्या समाजातील घटकांनी फायदा होत आहे, डॉ सज्जन गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षण यावर आपले विचार मांडले, डॉ.अशोक माळशिखरे यांनी मुक्त विद्यापीठ आणि विद्यार्थी यांचा संवाद वाढण्यासाठी सुचना केल्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.धनश्री मुनोत यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रसंयोजक डॉ.अशोक कोरडे यांनी केले. त्यांनी अभ्यासकेंद्राची माहिती विषद केली, विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला, यावेळी तंत्रप्रमुख ज्ञानेश्वर खंदारे, डॉ.शिवराज पातळे, डॉ.श्रीकांत मगर, डॉ.नरेंद्र गवळी, प्रा.सुनिता बोंबे, डॉ.मिरा नाथ, डॉ.सुपर्णा देशमुख, डॉ.उद्धव चव्हाण, डॉ.विष्णु गव्हाणे, डॉ.पांडुरंग अनारसे, डॉ .योगेश रसाळ डॉ.विशाल वैद्य, प्रा.आशिष कटारिया आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमातील मान्यवरांचे आभार डॉ.अरुणा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.