पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवनेरी परिसरात शिवनेरी महादुर्ग महोत्सव १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ ला आयोजित करण्यात आला आहे. मात्र या महोत्सवाच्या आयोजन समितीमध्ये स्थानिक आमदार अतुल बेनके आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वगळण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये भाजप आमदार प्रविण दरेकर यांना स्थान देण्यात आल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

शिवनेरी महादुर्ग महोत्सवासाठी पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्यावतीने ८ कोटी रुपयांच्या निधीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मान्यता दिली. दरवर्षी १९ फेब्रुवारीला शिवनेरी किल्ल्यावर शासनाच्यावतीने शिवजयंती सोहळा साजरा होतो. मात्र मागील दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे हा सोहळा मर्यादित स्वरुपात साजरा करण्यात आला होता. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर यंदाचा शिवजयंती सोहळा दैदीप्यमान पद्धतीने साजरा व्हावा, याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही होते.

या महोत्सवासाठी मंत्री लोढा यांच्याशी चर्चा करून गुरूवारी (ता. १७) शासन आदेश काढत १८ ते २२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान शिवनेरी जुन्नर येथे महादुर्ग उत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उत्सवाच्या आयोजनासाठी जिल्हाधिकारी पुणे यांच्या अध्यक्षतेखाली बारा सदस्यांची समिती गठीत करण्यात आली.

यामध्ये आमदार प्रवीण दरेकर, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय पुरातत्व खात्याचे अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, उपविभागीय अधिकारी जुन्नर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व महावितरणचे कार्यकारी अभियंता, जुन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, राज्य पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक, नाट्य कलावंत जयेंद्र मोरे, विभागीय पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक आदींचा समावेश आहे. मात्र महोत्सव आयोजन करताना समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना वगळण्यात आल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.