महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर बदनामी करत मजकूर टाकल्याबद्दल लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी लोणिकंद पोलीस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली आहे.

याबाबत पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदिप सातव, हवेली तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार कंद, हवेली तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस गौरव झुरूंगे, समीर झुरूंगे यांनी लोणीकंद पोलिसांत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निवेदन लोणीकंद पोलिसांना दिले होते.

त्यानुसार लोणीकंद पोलीस ठाण्यात उपमुख्यमंत्री तथा  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावर बदनामी कारक मजकूर टाकल्या प्रकरणी सोशल मीडिया आयडी धारक अनिल हरपळे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनात लोणीकंद पोलीस करत आहेत