रत्नागिरी : जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन दिनांक २१ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात “जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन ” साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात व त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात. त्याप्रमाणे माहे नोव्हेंबर 2022 रोजी चा महिला लोकशाही दिन सोमवार 21 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित केला आहे.

रत्नागिरी जिल्हयाची भौगोलिक स्थिती लक्षात घेता ज्या महिलांना लोकशाही दिनास प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही अशा महिलांच्या सोयीच्या दृष्टीने, “रत्नागिरी जिल्हयातील महिलांना प्रायोगिक तत्वावर फोनव्दारे संपर्क करुन 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या महिला लोकशाही दिनात जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या 1077 या टोलफ्री क्रमांकावर दुपारी १२ ते १ वाजता या वेळेत त्यांचे निवेदन/ अर्ज नोंदविता येतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती रत्नागिरी यांनी कळविले आहे.