शिरुर: शिरुर तालुक्यातीलआंधळगाव येथील सुनिल विलास कुसेकर, भानुदास पोपट नलगे या शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जुन महिन्यात तोडून ट्रक्टरमध्ये वाहून नेला आहे. याचे पेमेंट 15 दिवसांच्या आत देतो असा विश्वास देवुन ती रक्कम त्या शेतकऱ्यांना आजरोजी पर्यंत न देता त्यांची आर्थिक फसवणुक केल्याने शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिल कुसेकर यांचा 58.670 टन उस दोन ट्रॅक्टर मधून नेऊन उसाचे एकूण 139,400 /रु. (एक लाख एकोणचाळीस. हजार चारशे रुपये व भानुदास नलगे यांचा 119 टन उस दोन ट्रॅक्टर मधून नेउन उसाचे एकूण 2,83,800/- (अक्षरी दोन लाख ऐंशी हजार रुपये रक्कम इतकी आर्थिक फसवणुक केल्याने या शेतकऱ्यांनी आरोपी १) आशिष शांताराम साठे, रा. नागरगांव, (ता. शिरुर), जि. पुणे, २) नवनाथ सुभाष झेंडे, रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांच्यावर शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल दाखल केला आहे. पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप यादव हे करीत आहे.