मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १२ वर्षांपासून रखडले असल्याने कोकणवासीयांचे हाल होत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा करून पुढील नियोजनाची रूपरेषा आखण्यासाठी 'जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समिती' ने रविवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत सभेचे आयोजन केले आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, शारदा टॉकीजच्या बाजूला, नायगाव, दादर पूर्व येथे ही सभा होणार आहे. मूळच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणकरांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ८३६९८९२१०५ (कैलास), ९०२९४१०३२१ (अनिल), ८६५२५०५५४२ (रुपेश), ९०८२४६०९१३ (तृशांत) यांच्याशी संपर्क साधावा. 

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं