कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील उचगाव येथून सहलीसाठी रत्नागिरीत आलेल्या १०० मुलांच्या ग्रुपमधील तेरा वर्षीय मुलगा आरे-वारे समुद्रात बुडाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला वेळीच बाहेर काढण्यात आले. प्रकृती खालावल्याने त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार करून कोल्हापूरला हलविले आहे. बुधवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली.याबाबत मिळालेली माहिती अशी. कोल्हापूर उजगाव येथील एका शाळेची सहल रत्नागिरीत आली होती. शिक्षक १०० मुलांना घेऊन रत्नागिरीत आले होते. सर्वजण दुपारी एकच्या सुमारास आरे वारे समुद्रकिनारी पोचले. तेथे गेल्यानंतर मुले मौज मजा करण्यासाठी समुद्रात उतरली होती. बराच वेळ मजा मस्ती सुरू असताना अचानक आदित्य अरुण मंचावकर (वय 13) हा मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर समुद्रात ओढला जाऊ लागला. हे लक्षात येताच सोबत असलेल्या मुलासह शिक्षकांनी ओरडा केला. तो ऐकून स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यातील काही ग्रामस्थांनी समुद्र जाऊन आदित्यला बाहेर काढले. त्यानंतर आदित्यला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो मूळचा कोल्हापूर येथे असल्याने रात्री उशिरा त्याला कोल्हापूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Varanasi House Collapsed: वाराणसी में हादसा, भरभराकर गिरे दो मकान; 8 लोग मलबे में दबे | Aaj Tak
Varanasi House Collapsed: वाराणसी में हादसा, भरभराकर गिरे दो मकान; 8 लोग मलबे में दबे | Aaj Tak
*कोटा शहर में पहली बारिश एक नजर में एम एस ब्रेकिंग न्यूज़ के साथ*#विरालशोर्ट्स
*कोटा शहर में पहली बारिश एक नजर में एम एस ब्रेकिंग न्यूज़ के साथ*#विरालशोर्ट्स
पर्यूषण पर्व के आठवें दिन पंडित सरस शास्त्री ने उत्तम त्याग धर्म के बारे में समझाया
बूंदी :- जैन चौगान आश्रम में आज आठवें दिन पं. सरस शास्त्री धर्म सभा को संबोधित करते हुए...
શંખેશ્વર ખાતે પોલીસ સ્ટાફ દ્વારા ફ્લેગ માર્ચ કાર્યક્રમનુ આયોજન | SatyaNirbhay News Channel
શંખેશ્વર ખાતે પોલીસ સ્ટાફ દ્વારા ફ્લેગ માર્ચ કાર્યક્રમનુ આયોજન | SatyaNirbhay News Channel
Vikram Gokhle Died: 77 की उम्र में अभिनेता विक्रम गोखले का निधन, पुणे में ली आखिरी सांस
बॉलीवुड एक्टर विक्रम गोखले का निधन हो गया है. वो लंबे समय से बीमार चल रहे थे. जानकारी के मुताबिक,...