कन्नड तालुक्यातील नागद-सायगव्हाण परिसरातील भिलदरी पाझर तलावात बुडून दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.१४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.काजल परशुराम पवार (वय १५), मीनाक्षी परशुराम पवार (वय १३, दोघी रा.होळणाथा ता.शिरपूर जि.धुळे) असे मृत्यू झालेल्या सख्ख्या बहिणींची नावे आहेत.पोलिसांनी सांगितले की, दोघी बहिणी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास भिलदरी हद्दीतील छोट्या पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पाण्यात पाय घसरून पडल्याने बुडून दोघींचाही मृत्यू झाला. सदरील मुली या भिलदरी येथील गोरख झिपा पवार यांच्या वीटभट्टी वर आपल्या पालकांसह मजुरी करण्यासाठी आलेल्या होत्या. सदर घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलिस उपनिरीक्षक सागरसिंग राजपूत,पोलिस हवालदार अजय मोतींगे, पोलिस नाईक लक्ष्मण गवळी यांनी धाव घेत पंचनामा केला. नागद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा बदलून आलेल्या सर्व सामान्य कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पन्ना के दूरस्थ आदिवासी अंचल कल्दा-श्यामगिरी पठार में पहली बार श्रीराम कथा का सबसे बड़ा आयोजन।
पन्ना के दूरस्थ आदिवासी अंचल कल्दा-श्यामगिरी पठार में पहली बार श्रीराम कथा का सबसे बड़ा आयोजन।
NAVI MUMBAI || ICL कॉलेज च्या भोंगळ कारभारा विरोधात अखिल भारतीय विध्यार्ती परिषदेचे आंदोलन
NAVI MUMBAI || ICL कॉलेज च्या भोंगळ कारभारा विरोधात अखिल भारतीय विध्यार्ती परिषदेचे आंदोलन.......
બનાસકાંઠા માં વહેલી સવારે ભૂકંપ નો આંચકો અનુભવાયો...
બનાસકાંઠા માં ભૂકંપ નો આચકો અનુભવાયો...
ડીસા, પાલનપુર દાંતીવાડા સહિત જિલ્લા માં...
মৰাণ আৰক্ষীয়ে আটক কৰিলে মোবাইল চোৰ
মৰাণ আৰক্ষীয়ে আটক কৰিলে মোবাইল চোৰ
दीपावली त्यौहार पर आमजन को मिलेगी शुद्ध और मिलावट हीन खाद्य सामग्री
मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा के निर्देशों की अनुपालना में दीपावली त्यौहार के दौरान प्रदेशवासियों...