सणसवाडीत इंडीव्हर कारच्या धडकेत एक ठार दोघे जखमी

( शिक्रापूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील येथील पुणे नगर महामार्गावर भरधाव वेगाने आलेल्या इंडीव्हर कारचची दुचाकीला जोरदार बसून एका युवकाचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याची घटना असून सोहेल अल्लाउद्दिन अलवी याचा मृत्यू तर स्वप्नील संजय नागवडे व अभिजित विजय नागवडे हे दोघे जखमी झाल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अजित दत्तात्रय लांडे या कार चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

                              सणसवाडी ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरुन सोहेल अलवी हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ टी एल ०२२८ या दुचाकीहून त्याचे दोन मित्र स्वप्नील नागवडे व अभिजित नागवडे या दोघांना घेऊन पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना अचानकपणे पाठीमागून एम एच १२ टी डी ९७९८ हि इंडीव्हर कार भरधाव वेगाने आली आणि तिची दुचाकीला जोरदर धडक बसली यावेळी कारची अतिशय जोरात दुचाकीला धडक बसल्याने कारच्या सर्व एअर बॅग खुल्या झाल्या दरम्यान दुचाकीवरून तिघे जण रस्त्यावर पाडून गंभीर जखमी झाले तर कार सह दुचाकीचे खूप मोठे नुकसान देखील झाले, यावेळी झालेल्या अपघातात सोहेल अल्लाउद्दिन अलवी वय २० वर्षे रा. पाटील प्लाझा सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बाभूळसर बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे याचा मृत्यू तर स्वप्नील संजय नागवडे वय २५ वर्षे व अभिजित विजय नागवडे वय २५ वर्षे दोघे रा. पाटील प्लाझा सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बाभूळसर बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे हे गंभीर जखमी झाले असून याबाबत स्वप्नील संजय नागवडे वय २५ वर्षे रा. पाटील प्लाझा सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बाभूळसर बुद्रुक ता. शिरुर जि. पुणे याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी इंडीव्हर कार चालक अजित दत्तात्रय लांडे रा. रांजणगाव गणपती ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर हे करत आहे.