संगमेश्वर : तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांशा उदय कदम  हिने दिल्ली येथे झालेल्या ५० व्या दिल्ली येथे वरिष्ठ नॅशनल कॅरम चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन ब्रॉंझ पथकाची कमाई करत चमकदार कामगिरी केली आहे. आपल्या गावा बरोबरच तालुक्याचे नाव देखील तिने रोशन केले आहे. वय अवघे १७ वर्ष पण तिची भरारी वाखाणण्याजोगी अशीच आहे. सध्या ती वरिष्ठ पातळीवरील कॅरम स्पर्धेत भाग घेऊन चांगल्या चांगल्या खेळाडूंना हरवून,आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे आकांक्षा ही सिनिअर गटात खेळणारी सर्वात , लहान खेळाडू म्हणून सहभागी झाली होती‌. ती सध्या केंद्र सरकारच्या एअरपोर्ट एथॉरिटीकडून खेळाडू म्हणून खेळत असून तीने देशात वैयक्तिक ब्रॉंझ पथक मिळविले असून संघाला देखील ब्रॉंझ पदक मिळवून देण्यात तिचा सिंहाचा वाटा आहे.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

आकांक्षा हीने या स्पर्धेत उत्तर प्रदेशची ममता कुमारी, चंदीगडची सानीया, निधी गुप्ता कर्नाटकची शायनी तसेच महाराष्ट्राची नीलम या नावाजलेल्या कॅरम पट्टूचा पराभव करून विजय संपादन केला आहे. आकांक्षा ही आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू असून मालदीव येथे झालेल्या कॅरम स्पर्धेत पदार्पणातच देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर वाराणशी येथे झालेल्या कनिष्ठ गटाचीही ती विजेती आहे.

गतवर्षी वाराणशीत झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील वरिष्ठ कॅरम स्पर्धेत आकांक्षा आठव्या स्थानी होती. आजपर्यंत तिने तब्बल सहा वेळा राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचे विजेते पद पटकावले आहे. तर दोन वेळा तिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले आहे. आतापर्यंत आकांक्षा ही ज्युनिअर गटातून सहा वेळा राष्ट्रीय स्तरावर खेळली असून या स्पर्धेत तिला दोन गोल्ड , दोन सिल्व्हर व दोन ब्रॉंझ अशी एकूण सहा पदके मिळाली आहेत. आकांक्षाने कमी वयात कॅरममध्ये चांगलीच चमकदार कामगिरी केली आहे. आपल्या मामाच्या पावलावर आपले भविष्य उज्वल करीत आहे. देवडे सारख्या एका लहानश्या खेड्यातील आकांक्षाने कॅरम या खेळामध्ये चांगलीच भरारी घेतली आहे. तिच्या या यशात कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री.केदार, यतीन ठाकूर, तिचा मामा आणि आंतरराष्ट्रीय कॅरमपट्टू संदीप देवरुखकर, महेश देवरुखकर, भाऊ यश,आई-बाबा आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सर्व पदाधिकारी  यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल आकांक्षाचे सर्वत्र कौतुक होत आहे.