पुणे: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सोमवारी मांजरी हडपसर येथील संस्थेत थाटात पार पडला. कुठलाही अनाथ मुलगा किंवा मुलगी उपेक्षित आणि वंचित राहु नए यासाठी ईश्वराने सिंधुताईंना अनाथांसाठी देवदूत म्हणून या पृथ्वीवर पाठविले, त्यांच्या हातून ईश्वरीय कार्य घडले, अशी भावना व्यक्त करून प्रतिभाताई पाटील यांनी आयोजित बाल मेळाव्यात चिमुकल्यांशी मनमोकळेपणाने दिलखुलास संवाद साधला.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

ममता बाल सदन कुंभारवळण, सन्मती बाल निकेतन संस्था मांजरी हडपसर, मनःशांती छात्रालय शिरूर आणि वनवासी गोपालकृष्ण बहुउद्देशीय मंडळ शहापुर चिखलदरा या सर्व संस्थाच्यां वतीने आज पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांची जयंती आणि बालदिनाचे औचित्य साधुन माईंच्या पूर्णाकृति पुतळ्याचे अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते सिंधुताईंच्यां पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी त्यांनी चिमुकल्या मुलांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, 'सिंधुताई अदभूत शक्ति होत्या, अतिशय धाड़सी व्यक्तिमत्व होत माया, करुणा, ममता काय असते याच त्या जीवंत उदाहरण होत्या. रस्त्यावर कोमेजलेल्या फुलांना उचलून त्यांनी झाड़ बनून मायेची सावली दिली. संगोपण आणि पालन पोषण करून त्यांनी कोमेजलेल्या फुलांना जीवनदान देऊन उमललेल्या फुलांसारखे घडविले ही खूप मोठी गोष्ट आहे, अश्या शब्दात प्रतिभाताईंनी सिंधुताताईंच्या कार्याचा गौरव केला. मी थकले असले तरी आज तुम्हा सर्व चिमुकल्यांना भेटून मला खूप आनंद होत आहे, माझ्याकडून तुम्हाला सर्वांना उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा आहेत असे म्हणत प्रतिभाताईंनी सर्व मुला-मुलींना चॉकलेटचे वाटप केले.

या प्रसंगी ममता सिंधुताई सपकाळ यांनी कार्यक्रमाची माहिती देऊन माईंचे आणि प्रतिभा ताईंचे असलेले ऋणानुबंध यावर प्रकाश टाकला. आज १० महीने झालेत आई आमच्या सोबत नाही पण ती इथेच आहे अशी आमची सर्वांची भावना आहे. आम्ही आजपासून इथे निर्माण केलेल्या पुर्णाकृती पुतळ्यासोबत संवाद साधत राहु. आज आपण या कार्यक्रम मध्ये आई म्हणून उपस्थित राहून मुलांशी संवाद साधला या बद्दल ममता यांनी प्रतिभाताईंचे आभार मानूंन शाल श्रीफळ आणि प्रतिमा भेट दिली.

यावेळी ममता बाल सदन कुंभार वळणचे अध्यक्ष दिपक दादा गायकवाड़, मनःशांती छात्रालय शिरूरचे अध्यक्ष विनय नितवने यांच्यासह माईंवर प्रेम करणारा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम प्रतिभाताईंचे आगमन होताच त्यांचे ओक्षवन केले. त्यानंतर सभागृहात आगमन होताच चिमुकल्यांनी टाळ्याचा कडकडाट केला त्या मुलांना दोन्ही हात जोडून पुढे सरकत असतांना सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फिरविला मायेचा हात

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या आज खूप थकल्या आहेत जवळपास त्यांनी वयाची ८८ वर्षे पूर्ण केली आहेत. आज त्या माईंच्यां संस्थेत आल्या असता त्यांनी आपल्या समोर बसलेल्या चिमुकल्यांना जवळ घेत लाड़ केला. एवढंच नव्हे तर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर मायेचा हात फिरवित त्यांना कुरवाळले. यावेळी आपले समोर बसलेल्या एकसाथ एवढ्या साऱ्या चिमुकल्याकडे बघुन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यातील आई जागृत होऊन त्यांच्या भावना चेहऱ्यावर जाणवत होत्या. त्यांचे डोळे भरून आलेले सभागृहात उपस्तितांनी अनुभवले.

माईंच्या स्मृती जागवत गहिवरल्या शकडो पाणावल्या डोळ्यांनी साजरी केली जयंती

अनाथांच्या,उपेक्षितांच्या तसेच वंचितांचा जगण्याची नवी उमेद देणारा अखंड ऊर्जेचा प्रेरणास्त्रोत सिंधूताई सपकाळ हे केवळ एक नाव जगभर परिचित होते,प्रेमाला पोरक्या झालेल्या शेकडो निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या तसेच प्रचंड ऊर्जा व आत्मविश्वासाने अनाथांच्या समस्यांचे निराकरण करत त्यांना आपले नाव देत ‘अनाथांच्या आई’ बनल्या होत्या,“ज्यांना कोणीच नाही त्या सर्वांसाठी मी आहे” असे त्या अत्यंत प्रेमाने बोलून दाखवित असत. माईविना पोरखा झालेला सन्मती बाल निकेतन संस्था मांजरी बु पुणे येथे आज माईंच्या स्मृती जागवत गहिवरल्या शकडो पाणावल्या डोळ्यांनी प्रथम जयंती साजरी करण्यात आली.