संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावनदी अपघात प्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाच्या कामांना तसेच मोर्‍यांच्या बांधकामांना वेग आला आहे.महामार्गाचे काम जोरदारपणे सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु महामार्गावर पडलेले भलेखड्डे जैसे थे असल्याने त्याचा पहिला बंदोबस्त करण्याची मागणी वाहनचालक आणि प्रवाशांनी केली आहे.

कोणत्याही प्रकारचे उपाययोजना केली जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे . संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातक्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम चालू आहे. महामार्गावर मोऱ्या टाकण्याचे काम सुरू असून खड्डे पडलेल्या ठिकाणी खड्डे बुजवण्यासाठी काही ठिकाणी मातीचा वापर सुरू असतों कामामुळे मोऱ्या धोकादायक बनल्या असून धोकादायक ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने रस्त्यात चुकलेले वाहन थेट नदीत कोसळण्याची भीती वर्तन येत आहे तसेच मोरी बांधकामाचे काम करत असताना चढा उतारामुळे अपघात घडत आहेत. छोट्या वाहनाना गतीचा अंदाज येत नसल्याने धडक बसून अपघात घडत आहेत. चौपदरीकरणाचे काम करत असताना धोकादायक ठिकाणी सिग्नल तसेच कोणतीच यंत्रणा नसल्याने अपघातांमध्ये वाढ होत असून मोर्‍यांच्या बांधकामाठिकाणी वाहनांचा अपघात झाल्यास वाहने थेट नदीत कोसळण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

चार वर्षापूर्वी गोळवली या ठिकाणी रस्त्यावर खड्डा चुकवत असताना वाहन थेट नदीमध्ये कोसळले होते या अपघातात तिघांचा मृत्यू झाला होता वाहनांचे अपघात थांबवण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून थेट उपाय योजना करण्यात यावेत अशी मागणी होत आहे. तसेच महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या धुळीपासून आजारांना निमंत्रण दिल्यासारखे होतं आहे त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.