गेली अनेक वर्षे रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग व असलेल्या रस्त्यावर पडलेले खड्यांबाबत सर्वसामान्य नागरिक एका छताखाली एकत्र येत लवकरच मोठे आंदोलन छेडणार आहेत यासाठी विविध संघटना सेवाभावी संस्थेच्या पदाधिकारी अध्यक्षयाच्या मुंबई विभागात भेटी घेत आंदोलनची तयारी करण्यात येत आहे.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गबाबत पुढील नियोजन संदर्भात प्रत्येक प्रतिष्ठान, संघटना यांचे संस्थापक, अध्यक्ष यांच्या मार्गदर्शन व पाठिंबा मिळावा याकरिता भेटी घेण्यास सुरुवात झालेली आहे.
तसेच वरिष्ठ व्यक्तिमत्व यांच्या मार्गदर्शन भेट घेण्यात येत आहेत. मुंबई उच्च न्यायालयात मुंबई गोवा महामार्ग संदर्भात ज्यांनी प्रथम आपली याचिका दाखल केली ते कोकणसुपुत्र अँड. ओवेस पेचकर याची नुकतीच भेट घेण्यात आली त्याच प्रमाणे सेवाभावी संघटना सह सर्वसामान्य नागरिक यांना एकत्र घेत सोशल मीडियावर आंदोलन ची रणनीती बाबत सल्लामसलत करण्यात येत आहे.
मुंबई - गोवा महामार्ग संदर्भात कोकणकरांच्या यातना कोणीही समजून घेत नाही यासाठी एखाद खरच जनआक्रोश होणं गरजेचं आहे आणि त्या आंदोलनात स्वतः जनता आणि कोकणकर म्हणून अनेक जण उतरणार आहेत मोठ्या प्रमानावर कोकणकर उतरले पाहिजेत जेणेकरून या आंदोलनाची दखल शासन दरबारी पोहचेल, सर्व माध्यम याची दखल घेतली.
सदर जनआक्रोश आंदोलन हे मुंबईमध्ये करण्यात येणार आहे, यापूर्वी बऱ्याच आंदोलनकर्त्यांनी आंदोलने उभारली. परंतु सरकार त्यांना आश्वासन देतेय याच्यापलीकडे काहीही करत नाही. त्यामुळे हे आंदोलन वेगळ्या पद्धतीत असावे याबाबत रणनीती आखण्यात येत आहे. जेणेकरून सरकार दरबारी याची दखल घेतली जाईल.
सदरचे आंदोलन हे अराजकीय असल्याने या आंदोलनाचे नेतृत्व सर्वसामान्य जनतेने कराव यामध्ये कोणीही राजकारणी आपल्यात सामील झाले तर त्यांना पक्षाचा झेंडा बाजूला ठेऊन कोकणकर म्हणून सहभागी होवे असे आवाहन मीडियाच्या मांद्यमातून करण्यात येत आहे.