*परभणी जिल्ह्यात १ - २२० केव्ही, २ - १३२ केव्ही व साधारणपणे २० - ३३केव्ही ची आवश्यकता-लोणीकर यांची माहिती*
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
*तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळेच जालना जिल्ह्यातील विजेचा प्रश्न मार्गी लागला - लोणीकर*
परभणी प्रतिनिधी-
परभणी जिल्ह्यामध्ये विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून शेतकऱ्यांना आठ दिवस दिवसा तर आठ दिवस रात्री वीज मिळते आहे असे भारनियमन अधिकाऱ्यांनी कशाच्या आधारे केले आहे याचे उत्तर महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे नाही. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील गंभीर बनवलेल्या विजेच्या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावे अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
परभणी जिल्ह्यातील विजेचा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठी जिल्ह्यात १ - २२० केव्ही, २ - १३२ केव्ही व साधारणपणे २० - ३३केव्ही करणे आवश्यक आहेत. सद्यस्थितीत परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची विजेसंबंधीची अवस्था अत्यंत बिकट बनली आहे. अशी माहिती देखील लोणीकर यांनी पत्राद्वारे फडणवीस यांना दिली आहे.
मागील पंचवार्षिक मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन ऊर्जामंत्री व विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जालना जिल्ह्यात २ - २२० केव्ही, १ - १३२केव्ही व ४९ - ३३केव्ही मंजूर करून आपण जालना जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना दिलासा दिला होता त्यामुळे आज जालना जिल्ह्यातील विजेची परिस्थिती अत्यंत चांगली असून त्याबाबत शेतकरी समाधानी आहे. त्याच धर्तीवर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार करून लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी लोकप्रतिनिधी म्हणून व तमाम शेतकरी बांधवांची मागणी असल्याचे देखील लोणीकर यांनी पत्रात म्हटले आहे.
जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना देवेंद्र फडणवीस या मागणीचा सकारात्मक विचार करतील व देवेंद्र फडणवीस हेच जिल्ह्यातील विजेचा गंभीर बनलेला प्रश्न सोडवू शकतात याची खात्री असल्याचे लोणीकरांनी पत्रात म्हटले आहे.