बीड(प्रतिनिधी)शेतकरी,शेतमजुर,कामगार,नोकरदार,ग्राहक,महीला पुरूषांनी आपल्यावर होणारा अन्याय सहन न करता सदैव जनसेवेत असलेले राजश्री शाहू महाराज विचार मंच हे आपल्या अन्यायाला वाचा फोडुन योग्य न्याय मिळवून देईल सध्या देशभरात गोरगरीब जनतेवरती एक प्रकारे अन्याय सुरू असुन हा अन्याय सहन केला जाणार नाही सत्ताधारी हे आज गुलामगिरी लादू पाहत आहेत पंरतु जर न्यायाची भुमिका घेत नसाल तर विचाराने पेटलेल्या वस्तीत आमचा जन्म झाला आहे संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे संघर्षाच्या माध्यमातून व लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंचाच्या वतीने अन्याया विरूध्द पेटुन उठेल असा ईशारा लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंच संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाटाचे युवक नेते विवेक कुचेकर यांनी दिला आहे.

देशातील सर्व नागरिकांना भारतीय राज्य घटनेने मुलभुत हक्क अधिकार दिलेले आहेत ते अधिकार कोणी हिरावुन घेऊ शकत नाही देशातील गोरगरीब सर्वसामान्य लोकांचे जीवन अतिशय निराशाजनक असून सध्या देशात प्रस्थापित भाडंवलदाराचे राज्य आले असुन यामुळे सर्व सामान्य नागरिक आज गुलामगिरीकडे खेचला जात आहे. कारखनदार,संस्थानिक,मालक प्रस्थापित भांडवलदार ईत्यादी प्रस्थापित गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना गुलामित ठेवुन त्यांच्यावरती एक प्रकारे अन्याय करत आहे अश्या अन्याय ग्रस्तांनी फक्त हाक दयावी लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंच आपल्या पाठीशी कायम ऊभा राहील व आपल्याला न्याय मिळवून देईल शासन व प्रशासनाने सत्ताधारी वर्गाच्या हातचे बाहुले न बनता सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय दयावा अन्यथा आपण न्यायाची भुमिका घेत नसाल तर अन्यायाची घेऊ नका कारण विचाराने पेटलेल्या वस्तीत आमचा जन्म झाला आहे असा इशारा लोकराजा छञपती शाहू महाराज विचार मंच संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बालाघाटाचे युवक नेते विवेक कुचेकर यांनी दिला आहे