पाथरी(प्रतिनिधी)स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून पाथरी येथे प्रहार संघटनेकडून जल्लोष करीत फटाके व पेढे वाटून दिव्यांगांचा सत्कार करण्यात आला.
आ.बच्चू कडू यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मागील 25 वर्षांपासून दिव्यांग बांधवांंच्या न्याय हक्कासाठी त्यांचा लढा चालू आहे. राज्यात दिव्यांगांचे एक स्वतंंत्र मंत्रालय असावे या मागणीला यश आले असून राज्य शासनाने राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय मंजूर केले आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य ठरले आहे. आ.कडू यांनी सातत्याने लावून धरलेला प्रश्न सुटला असून स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयास राज्य शासनाची मान्यता मिळाली आहे. या यशाचा जल्लोष आज प्रहार संघटना पाथरीच्यावतीने तहसिल समोर पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी दिपकभाऊ खुडे दिव्यांग प्रहार तालुका अध्यक्ष पाथरी,सौ कल्पनाताई नागरगोजे प्रहार दिव्यांग महिला तालुका अध्यक्ष पाथरी,सतीश नखाते प्रहार हादगाव सर्कल प्रमुख,नितीनकुमार वैराग प्रहार सेवक
संजय ठाकूर, संतोष मस्के, मोसिन शेख, अफसर खान पठाण, मनोज कुमार माने प्रहार शहर अध्यक्ष पाथरी, दत्ता पवार, तोफिक अन्सारी इत्यादी प्रहार सेवक उपस्थित होते.