पुणे: मार्केट यार्ड येथील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करुन तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

दरम्यान, गोळीबाराच्या या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात घबराट निर्माण झाली होती. मार्केट यार्ड परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास चोरटे कार्यालयात शिरले. चोरट्यांनी चेहरे कापडाने झाकले होते. चोरट्यांनी अंगडिया कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली. कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी चोरट्यांनी गोळीबार केला.

कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.