आष्टी (प्रतिनिधी) आष्टी नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात विज कनेक्शन तोडू नये अन्यथा विज महावितरण कार्यालयातील अधिका-यांना घेराव घालू असा इशारा शिवसंग्राम चे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यानी दिला आहे.
अगोदरच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकाला लागणारी विज खंडीत करून त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम हे महावितरण करत आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा ज्वारी गहू भूईमुग शेंगा या पिकांना पाणी देण्याचा मौसम असताना थकित विज बिलाच्या वसूली पोटी महावितरण कडून शेतीपंपाचे कोणतीही पूर्व सूचना न देता गावागावातील विज कनेक्शन तोडून ट्रान्सफार्मर बंद केले जात आहेत,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून रब्बी हंगामातील पीके वाळून जात आहेत. एकीकडे गावातील शेती पंपाच्या थकीत विज बिलापैकी ६७% विजबिल माफ केल्याची घोषणा राज्य सरकारकडून केली असली तरी त्याची अमलबजावणी होत नाही. त्यातच उर्वरीत ३३% विजबिल भरणा करावा असे परीपञक असताना सक्तीची वसूली करत असून वीज बिल न भरणा-या शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण पिके वाळून जात आहेत.
सक्तीची वसूली आणि राज्य शासनाची रोज बदलत असलेली विज जोडणी संदर्भातील नियम यावरही चौधरी यानी टीका केली आहे. महावितरण कर्मचारी सरसकट शेतकऱ्यांच्या डीपी बंद करून सक्तीची वसूली करत आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होत आहे परंतु यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे कामही हे महावितरण चे अधिकारी व जुलमी सरकार करत आहे अशी टीका चौधरी यानी केली असून असेच महावितरण अधिकारी शेतकऱ्यांचे विज कनेकूशन तोडून ञास देत असतील तर महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारू व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ असा इशारा शिवसंग्राम आष्टी च्या वतीने दिला आहे.