कोल्हापूर: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कसबा बावड्यातील ऑनर किलिंगप्रकरणी दोघा सख्ख्या भावांना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज दोषी ठरवले. त्यांना जन्मठेपेसह 10 हजार रुपयांची शिक्षा सुनावली.
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
गणेश महेंद्र पाटील (वय २५) व जयदीप महेंद्र पाटील (२४, दोघे राहणार थेरगाव, ता. शाहूवाडी) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात पुरावा नष्ट करणाऱ्या नितीन रामचंद्र काशीद (२७) याला साडेतीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सरकारी पक्षातर्फे बाजू मांडणारे ॲड. विवेक शुक्ल यांनी सांगितले. बहिणीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन दोघा सख्ख्या भावांनी बहीण व तिच्या पतीचा खून केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. पी. गोंधळेकर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. खटल्याच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले होते.
याबाबत घडलेली घटना अशी, थेरगाव येथील मेघा महेंद्र पाटील हिने इंद्रजित श्रीकांत कुलकर्णी यांच्याशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर दोघे कसबा बावड्यातील गणेश कॉलनीत राहायला आले होते. मेघा ताराबाई पार्क येथे नोकरीस होती.तिने प्रेमविवाह केल्याचा राग भावांच्या मनात होता. मेघा व इंद्रजितला जिवे मारण्याचा त्यांनी कट रचला. त्यात आणखी एकाला सामील करुन घेतले. त्याच्याच गाडीवरून ते १६ डिसेंबर २०१५ ला कोल्हापुरात पोहोचले. मेघाच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी तिला चहा करण्यास सांगितले. इंद्रजित दूध आणण्यासाठी घराबाहेर गेले असताना, त्यांनी बहिणीच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला.
तिच्यावर केले चाकूचे वार
तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यावर तिचा मृतदेह मोरीत ठेवला. थोड्या वेळात पती परतल्यानंतर त्याच्यावरही चाकूचे वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पोर्चमध्ये पडला. त्यानंतर ते दोघे मित्राच्या मोटारसायकलवरून पळून गेले. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या घटनेने मात्र राज्यात खळबळ उडाली होती.
तत्कालीन सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली होती. त्यांच्या बदलीनंतर दोन्ही पक्षाचे युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. गोंधळेकर यांच्यासमोर झाले. ॲड. शुक्ल यांनी या प्रकरणी सोळा साक्षीदार तपासले. त्यांच्या युक्तिवादानंतर न्यायनिवाडे व प्रत्यक्ष झालेले पुरावे ग्राह्य मानून शिक्षा सुनावण्यात आली.
गणेश व जयदीप यांना भारतीय दंड संहिता कलम ३०२ खाली दोषी ठरवून जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तसेच दंड न भरल्यास 1 वर्षे सक्तमजुरी, तर पुरावा नष्ट करणाऱ्या साथीदारास साडेतीन वर्षे सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, किरण गावडे, परशुराम गुजर यांनी तपास केला.
ॲड. शुक्ल यांना या कामी सहाय्यक फौजदार सुरेश परीट, निवृत्त हवालदार लक्ष्मण लोहार व सहाय्यक फौजदार शाम बुचडे यांनी मदत केली. या खटल्यासाठी स्पेशल प्रॉसिक्युटर नेमण्यात आले होते. त्यांनी काम अर्धवट सोडले. त्यानंतर २०१८ ला खटल्याचे कामकाज माझ्याकडे आले. तत्पूर्वी, तीन साक्षीदार फुटले होते. या खटल्यात सोळा साक्षीदार तपासले. तसेच काही साक्षीदारांना पोलिस संरक्षण देण्याची अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार साक्षीदारांना संरक्षण पुरविण्यात आले होते.