पुणे: ज्ञान प्रबोधनी स्कुल, पुणे येथील शाळेच्या बसचा रायगडमध्ये मोठा अपघात झाला आहे. माणगाव-रायगड रस्त्यावरील घरोशी वाडी येथे शाळेची बस दरीत कोसळली आहे. माणगाव-रायगड रस्त्यावर घरोशी वाडी येथे अपघात झाला आहे. सदर अपघात शुक्रवारी घडला आहे. या अपघातात 15 विद्यार्थी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले रायगडला सहलीसाठी आलेल्या खासगी मिनीबसला माणगाव तालुका हद्दीतील घरोशी वाडी येथे भीषण अपघात झाला आहे. पुण्याकडे जात असताना घरोशी वाडी घाट रस्त्याच्या तीव्र उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट शाळेची मिनीबस पंधरा ते वीस फूट दरीत कोसळली. सुदैवाने ही बस झाडा अडकल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

दरम्यान, या अपघातामध्ये १५ विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर सात जण जखमी झाले आहेत. पुणे येथील ज्ञान प्रबोधनी शाळेमधील शिक्षक, पालक आणि विद्यार्थी रायगड सहलीला आले होते. किल्ले रायगडाला भेट दिल्यानंतर शाळेचे विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थ्यांची बस परतीच्या प्रवासादरम्यान सदर अपघात झाला आहे.