बेल्जियम: स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हि ओळ आपण ऐकत मोठे झाले आहोत. आई विना जीवन व्यर्थ आहे. आईच्या वाटेवर कितीही काटे आले तरी ती मार्ग काढत आपल्या लेकरांचे पालन पोषण करते. असाच एक प्रकार बेल्जियम येथे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सारा तलबी नामक महिला राहते, या महिलेला दोन्ही हात नाहीत. मात्र, आपल्या दोन्ही पायांच्या जोरावर ती संसाराचा गाडा हाकत आहे. यासह मुलांचं पालन पोषण देखील करत आहे. तिच्या या अनोख्या शैलीचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून तिचे पायाने काम आणि मुलांचे पालन पोषण करत असतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

सारा तलबी ही महिला ब्रुसेल्सच्या बेल्जियम येथील राहणारी आहे. जन्मापासूनच तिला दोन्ही हात नाहित. तिच्या मुलीचे नाव लिलिया असून ती तीन वर्षांची चिमुकली आहे. सारा आपल्या मुलीचे पालनपोषण पायानेच करत आली आहे. यात तिच्या नवऱ्याने देखील तिला साथ दिली आहे. तिच्या मनात नेहमी एक भिती असायची की, आपल्या हातून आपल्या मुलीच्या पालनपोषण करण्यात काही कमी नको राहायला. परंतु, पायाच्या जोरावर तिने आपल्या मुलीची पुरेपूर काळजी घेतली आहे.

मुलीचे पालनपोषण करण्यासंदर्भात सारा म्हाणाली, "मुलीचा जन्म झाल्यानंतरचे तीन महिने फार आव्हानात्मक होते. कारण त्यावेळी मुलं फार नाजूक असतात. जेवण बनवताना एका स्टुलवर बसून, एका पायाने चाकू आणि दुसऱ्या पायाने भाज्या पकडून मी भाजी कापायची. पायाच्या मदतीने मुलीचे केस विंचरायची. याचबरोबर मुलीला कपडे घालणे, घरातील अन्य कामे करत होते". साराने आपल्या मुलीसोबत विकलांग असल्याची चर्चा केली. त्यांची मुलगी लिलिया आपल्या आईला चांगल्या पद्धतीने समजते. ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्या लहान वयात त्यांची मुलगी एवढ्या चांगल्या पद्धतीने आईला समजते आणि कोणत्या गोष्टीचा हट्ट करत नाही.

साराचे आपल्या पायाच्या बोटांवर खुप नियंत्रण आहे. पायाच्या मदतीने ती रुचकर जेवण, केक, पेस्ट्री बनवते. ती पीठही आपल्या पायच्या बोटांनीच मळते. सारा आपल्या पायाच्या मदतीने मेकअप करायलाही शिकली आहे. साराचा एक युट्युब चॅनल आहे. ज्यात 2.74 लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या या कलेबाबत जाणून घेण्यासाठी अनेक लोकं तीला फॉलो करतात. तिची मुलगी सारा 3 वर्षांची झाली आहे. सारा कोणाच्या मदतीशिवाय मुलीची काळजी घेते. सारा आपल्या सुखी संसारात खुप आनंदित आहे.